आज मी लिहिणार आहे धुळे शहाराबद्दल.
साधारण 13 वर्षांपूर्वी मेडिकल शिक्षणाच्या
📖 निमित्ताने माझा धुळ्यात आणि त्यातील acpm dental कॉलेज मध्ये प्रवेश झाला.नवीन वर्ष, नवीन कॉलेज व त्यातही नवीन शहर आणि मुख्य गावपासून साधारण 5-6 km लांब असलेलं आमचं कॉलेज.
📖 त्यामुळे पहिल्या वर्षी तर असं बाहेर जाणं झालच नाही फार. पण जसे तिथे राहत गेलो तिकडची खाद्य संस्कृती समजायला लागली आणि आवडायला देखील.
सर्व प्रथम माझ्या भेटीला आले ते शेवभाजी, gatte की sabji असे पदार्थ . तो पर्यंत शेवेची भाजी होऊ शकते आणि gatte असा बेसनाचा काही पदार्थ असतो हे मला माहित नव्हते. पण हळू हळू आवडायला लागले.तसेच डाळ बाटी churma हा ही त्यातलाच एक . आता खाली मी जे पदार्थ लिहीन ते मी साधारण 9 वर्षांपूर्वी कॉलेज सोडले तेव्हा दिलेल्या address वर मिळत होते.
1) सर्वप्रथम माझी सगळ्यात आवडती पाणीपुरी.
😍
😘 आग्ररोड च्या अलीकडच्या लेन मध्ये, त्याला आधी नवग्रही गल्ली म्हणत तिथे लालबाग पाणीपुरी वाला आहे tyachyakadchi पाणीपुरी म्हणजे खासमखास...दरवेळी गेलं की खायची. त्याला मी माझा धुळ्यात शिरण्याचा टॅक्स म्हणायचे
😂
😂
3) तिथून पुढे आग्रा रोड च्या दिशेने गेलं की एक dairy होती..त्याच्याकडची बासुंदी किंवा दूध म्हणजे पर्वणीच.
🍵
4) नदी काठाला असलेल्या साबुदाणा वड्यांच्या गाड्यांवरचे साबुदाणे वडे.
7) प्रभाकर आणि राजकमल आणि मनोहर adlabs theatre च्या समोर एक साधंच हॉटेल होतं. नाव exact आठवत नाही पण तिकडची भरीत भाकरी
🍪, शेवभाजी , डाळ खिचडी सगळंच लै
👌भारी होतं. शनिवार दुपारचा मूवी बघायच्या आधी आमचा तिथला लंच ठरलेला.
8)धुळ्यावरून आमच्या कॉलेज ला जाताना सिंधी कॅम्प लागायचा त्याच्या स्टॉप वर एक चाट ची गाडी असायची त्याच्या कडे डाळ पक्वान्न एकदम testy मिळतं
9) आमचं कॉलेज धुळे साक्री रस्त्यावरच्या मोराणे गावातलं. कॉलेज च्या थोडं पुढे जाऊन काठियावाडी ढाबा आहे तिकडची शेवभाजी,पनीर भुर्जी, नागली पापड आणि भाकऱ्या हा आमचा आवडता मेनु. काठियावडी च्या अलीकडे एक पाववडे वाला आहे त्याच्याकडे बटाटावडा व पाववडे दोन्ही खास मिळतात.
10) कॉलेज च्या अलीकडे कृष्णाई mhanun एक 3 स्टार हॉटेल आहे . त्याच्याकडच्या पदार्थांची टेस्ट फार चांगली आहे.तेव्हा आम्हाला फार अप्रूप होत त्याचं कारण तिथे तेव्हा असा खाणं सर्रास मिळायचं नाही ना.
11) aagra road जवळ एक थाळी पण मिळायची तेव्हा 80 rs. वगरे असेल... नाव चेतना dining हॉल होतं. घरच्या खाण्याची आठवण आली की आम्ही तिथे जायचो. मऊसूत पोळ्या आमचं मन तृप्त करायच्या.
12) मुंबई धुळे highway वरचे वालचंद बापू व त्याच्या बाजूचा ढाबा दोन्ही कडे छान जेवण मिळायचं.
13) लास्ट but not least महिंद्रा ढाबा. कॉलेज स्टुडंट्स ची जान रात्री अपरात्री कधीही उघडा. त्याच्या कडचा चहा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे.
ता.क.-मी जे काही लीहिल आहे ते साधारण 9 वर्ष आधीच आहे . आज कदाचित अजून खूप दुकानं/ गाड्या झाल्या असतील जिथे अजूनही खास पदार्थ मिळत असतील पण ते आज मला माहित नाहीत.ज्यांना माहीत असतील त्यांनी comment मध्ये add केले तरी चालतील.




No comments:
Post a Comment