#खाद्ययात्रा #खादाड_खाऊ_फूड_टूर
नमस्कार मित्रमंडळी,
आज पासून पुढील एक महिना आपण जिथे रहातो तिथे किंवा जाऊन आलो आहोत त्या प्रदेशाची फूड टूर अशी concept घेऊन काही खास पोस्ट सुरू करूयात.
त्या करता हॅशटॅग आहे #खादाड_खाऊ_फूड_टूर
ह्यात आपण रहात असू त्या गावातील रेस्टऑरेंट्स, फूड मार्केट, भाजी मार्केट, ग्रोसरी स्टोअर, स्ट्रीट फूड, फेरीवाल्यांकडचे खायचे पदार्थ, त्या गावातील खाल्लेच पाहिले असे पदार्थ, त्या गावच्या खास मिठाया, मिठाईवाले, त्या गावातील खास घरगुती पदार्थ / घरात बनवलेले पदार्थ अश्या विषया वर ह्या पोस्ट्स असतील.
कोणी नुकतेच कोणत्या प्रांतात अथवा परदेशात जाऊन आले असतील किंवा आता फिरत असतील त्यांनीही एक गाव/ शहर/देश असा विषय घेऊन तेथील खाद्ययात्रा घडवून आणू शकता.
फक्त पोस्ट करताना एक करायचे की केवळ फोटो न टाकता त्याबाबत महिती सुद्धा लिहायची की जेणे करून ती पोस्ट परिपूर्ण होईल. तेव्हा तुमची कल्पनाशक्ती लढवा आणि आम्हाला खाद्ययात्रा घडवून आणा.
, click here →
Newsletter
Get All The Latest Updates Delivered Straight Into Your Inbox For Free!
No comments:
Post a Comment