Menu

शेजवान सॉस schezwan sauce



शेजवान सॉस schezwan sauce




#खाद्ययाञा #खादाड

 खाऊ फूड टूर...
गिरीराज चायनीज
नाशिक मधे चायनीज पदार्थांसाठी फेमस...
माझ्या बहिणीचे....
काही प्रश्न असतील तर साईटला भेट द्यावी...
खाली सेजवान साॅस ची रेसिपी दिली आहे.तेही घरच्या घरी कसे बनवू शकतो....
शेजवान सॉस schezwan sauce
जास्तकरून इंडो चायनीज डिशमध्ये शेजवान सॉस घातला जातो पण कधी तुम्ही विचार केला आहे की हे घरी कसे बनवू शकता का? आज आम्ही तुम्हाला शेजवान सॉस तयार करण्याची विधी सांगत आहोत जे फारच टेस्टी लागते. तुम्ही याला बनवून आरामात एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता. शेजवान सॉसला मोमोज़, पराठे किंवा फ्राइड राइससोबत सर्व करू शकता.
साहित्य - वाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप, तेल- 1/3 कप, लसणाची पेस्ट - 4 चमचे, आल्याची पेस्ट - 3 चमचे, सोया सॉस- 1 चमचा, टोमॅटो केचप- 3 चमचे, सेलेरीची काडी किंवा कोथिंबीर साखर - 1/4 चमचा, मीठ - चवीनुसार.
विधी - सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्या. एक कप पाण्यात लाल मिरची ज्याच्या बिया काढलेल्या असतील त्यांना उकळून घ्या. जेव्हा उकळणे सुरू होईल तेव्हा त्याला कमी आचेवर ठेवा आणि 5 मिनिटापर्यंत उकळा. त्यानंतर पाणी गाळून मिरच्यांना हलक्या हाताने वाटून घ्या. आता एक पेनामध्ये तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर मिरच्यांची पेस्ट, सोसा सॉस, टोमॅटो केचप, चिरलेली सेलेरी/कोथिंबीर साखर आणि मीठ घालून मिक्स करा. मध्यम आचेवर ठेवा. जेव्हा सॉस शिजून जाईल आणि तेल सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. सॉसला थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हा सॉस किमान 2 आठवड्यापर्यंत राहू शकतो.

No comments:

Post a Comment

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels