Menu

सोलकढी-Solkadhi

#कोकण_मार्ट - #खाद्य_संस्कृती

आपल्या #खाद्यसंस्कृतीत जेवणाचा शेवट हा शक्यतो #गोडपदार्थाने केला जातो.
पण आपल्याकडे #मांसाहारी जेवणाचा शेवट हा वेगळा#पदार्थाने करायची ही एक वेगळी #प्रथा आहे.

#महाराष्ट्राला लाभलेला हा सागरी किनारा #सौंदर्याने आपल्याला#समृद्ध करतो ठीक तशीच #कोकणात बनवलेली #सोलकढीही चवीने #तृप्त करते. आणि जेवण #पचण्यास मदत करते.

चला मग आज आपण ही #सोलकढी बनवूया..

साहित्य:
• अर्ध्या ओल्या नारळाचा कीस
• 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• 3 ते 4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या
• 10 ते 12 कोकम/ 2 चमचे कोकम आगळ
• थोडीशी कोथिंबीर
• अर्धा चमचा जिरे
• चवीनुसार मीठ.

कृती:
•सर्व प्रथम 15 मिनिटे कोकम पाण्यात भिजवत ठेवा त्यासाठी गरम किवा साधे पाणी वापरू शकता.

•नंतर नारळाचं दूध बनवायला घ्या
अर्धा किसलेला ओला नारळ त्यात जिरे मिक्स करा आणि मिक्सर ला लाऊन बारीक करा.
बारीक केलेलं नारळाचं वाटण गाळणीने एका पातेल्यात गाळून घ्या अस नारळातील पूर्ण दूध निघे पर्यंत गाळा.

नारळाचं दूध तयार झालं की त्यात भिजत ठेवलेल्या कोकम च पाणी टाका आणि उरलेली कोकम हाताने बारीक करा (कुस्करा) आणि त्यात टाका किंवा 2 चमचे कोकम आगळ टाका.
2 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि ठेचलेली लसूण टाका
वरून चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर बारीक चिरून टाका आणि सर्व मिश्रण एक जीव करा.
त्यात लसूण आणि मिरचीचा खमंग स्वाद एकरूप झाला पाहिजे.

आपली सोलकढी तयार..

ती तुम्ही अशीही पिऊ शकता / किंवा फ्रिज मध्ये थंड करून पण पिऊ शकत.

#3_आगळचे_कोकम_पाहिजे_असल्यास
खालील नंबर वर संपर्क करा.
अस्सल कोकणातील नैसर्गिक रित्या 3 आगळाची #कोकम.
#कोकम_आगळ ही मिळेल.

अतुल बाणे
8355968332
डोंबिवली

No comments:

Post a Comment

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels