Menu
Recent Post

By :- Nilesh Ajit Chougule (Credits)
#Chef Nil:- my sweetu Recipes
#Kaju paneer masala
200 ग्राम फ्रेश पनीर, 150 ग्राम काजू का पेस्ट, 2
शिमला मिर्च, 2 प्याज, 10 ग्राम पीली मिर्च पावडर, 2 बड़े चम्मच तेल, 5 ग्राम अदरक का पेस्ट, 5 ग्राम लहसुन का पेस्ट, जीरा, गरम मसाला, नमक, काली मिर्च पावडर स्वादानुसार।
विधि : 
पनीर के टुकड़े कर लें। कड़ाही में तेल डालें। गरम होने पर जीरा डालकर तड़काएं। बारीक कटी हुई प्याज डालकर सुनहरा होने तक भूनें। अदरक-लहसुन का पेस्ट मिलाकर भूनें। बारीक कटी हुई शिमला मिर्च और काली मिर्च डालें।
काजू पेस्ट और बाकी मसाले डालकर पकाएं। जब मसाला तेल छोड़ने लगे तो पनीर के टुकड़ों पर डालकर गर्मागर्म सर्व करें।
वांग्याचं भरीत
साहित्य:
१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) वांगे भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.
0

0

माझं एक निरीक्षण आहे, की उत्तर भारत (उत्तर प्रदेश आणि वरचा पट्टा) दक्षिण भारत (खालची ४ राज्ये) उत्तर गुजरात राजस्थान (पश्चिम भारत) आणि प.बंगाल, बिहार-झारखंड आणि पूर्वोत्तर हा (पूर्व भारत) हे पण जोडू शकता ह्या प्रांतातील लोक सहसा आपल्या खाण्याच्या आणि राहण्याच्या सवयी बदलायला उत्सुक नसतात. मी कोचीला होतो तेंव्हा माझा एक फ्लॅटमेट हिमाचलचा होता ३ वर्ष त्या पठ्ठयाने ऑफिसच्या IRCTC कँटीनची नॉर्थ इंडियन थाळी खाल्ली. अर्थात त्यात पांढरा भात आणि पाणीदार वरण सोडलं तर काहीच चव नॉर्थ इंडियन नसायची. त्याची ही अवस्था बघुन मी त्याला २-३ वेळा तुडकिया भात हिमाचली धाम,आणि पनीर बटर मसाला खाऊ घातलं होतं. ती चव ऑथेंटिक होती का माहिती नाही पण "भाई घर की याद दिला दी आपने, १०० जियो और मेरे फ्लॅटमेट कर के जियो" ही त्याची दाद बोलकी असायची. अशीच तत्सम दाद मला राजस्थानी फ्लॅटमेट कडुन शुद्ध तुपातल्या काजू-बदाम युक्त कणकेच्या शिऱ्या साठी आणि तेलुगू फ्लॅटमेट कडुन हैदराबादी दम बिर्याणीसाठी आली आहे. बरं त्या तेलुगू मित्राने तर एका ऑफिशियल अभिनंदन मेल मध्ये काय लिहावं की प्रसाद हा थंड डोक्याने काम करणारा उत्तम कन्सल्टंट तर आहेच पण त्याहुन उत्तम शेफ आणि हैदराबादी बिर्याणी स्पेशालिस्ट आहे!! सहसा मी प्रचंड खवय्या असल्यामुळे बाहेर खायचो तेंव्हा ह्या लोकांना त्यांच्या प्रांताच्या बाहेरील काही डिशेस ट्राय करायला घेऊन गेलो तर ते खुप सेन्सेटिव्हली रिऍक्ट व्हायचे. नाही म्हणजे नाही हा हेका असायचा. उपाशी राहतील, अगदी कडीपत्ता घातलेली दक्षिण भारतीय पद्धतीची पनीरची भाजी खातील पण अप्पम-कडला करी कडे ढुंकूनही बघणार नाही. अट्टाहास हा ते पदार्थ कसे असतील हा नाही, तर हे काय जेवण आहे?? असा असायचा.
Authentic केरळी घरची चव, कडंबरा हॉटेल कोच्ची (near Wonderland)

मी बेट द्वारका गुजरातच्या किनारपट्टीपासून तर पार चेन्नई रामेश्वरम पर्यंत समुद्र किनाऱ्यावर राहिलोय. मनसोक्त खादाडी केलीय, पण जेंव्हाही आलपुळा ला गेलोय आणि पनीर मागविले असेल किंवा कोकणात पावसला येऊन मस्त ओलं खोबरं घातलेले पोहे सोडून समोसे ऑर्डर केलं आहे असं खचितचं झालं असेल. अस्सल महाराष्ट्रीय घरच्या जेवणानंतर मला केळीच्या ताज्या हिरव्यागार पानावर पालक्कड माट्टा राईस सोबत सर्व्ह केलेला केरळी साध्या सगळ्यात प्रिय आहे. नारळाच्या तेलाची अप्रतिम चव, वेगवेगळ्या प्रकारचे अवियल, पचडी, किचडी, बिन्स किंवा कॅबेज थोरन, मंगा करी, पुळी इंजी, शर्करा उप्परी, सांबार, रस्सम, पुलुशेरी, उच्चीकारी, पापडम आणि चेरी ऑन द टॉप आडा किंवा पालडा पायसम!! स्वर्गातील मेनकाच डोक्यावर थुई थुई नाचत असते जणु. एकीकडे दीपिका पदुकोण आणि एकीकडे ओणम साध्या ठेवलं आणि कुणावर अधिक प्रेम करतोस असं विचारलं तर मी बिनदिक्कतपणे ओणम साध्या कडे बोट दाखवेन. (हा नजरिया आली तर मात्र जरा विचार करावा लागेल) कदाचित केरळला मी चार वर्ष राहिलोय, किंवा ह्या राज्यावर तिथल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम आहे म्हणुन असेल. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक ह्या राज्यात देखील केळीच्या पानावर तत्सम ह्याच प्रकारचं जेवलोय, पण साध्यातली मजा इकडे येत नाही. मदुराई, तिरुमल्ला, हैदराबाद, मैसुर, बंगळुरू ह्यांची स्वतःची अशी वैशिष्ट्य आहेत पण एक तृपतेची ढेकर जी सरळ तुमच्या आत्म्याच्या गाभ्यातून येते ती साध्या खाल्ल्यावरच येते बाकीच्या पोटातून येतात. ते आंध्रप्रदेशातील जळजळीत जेवण मात्र काही केल्या पचतच नाही.
आदासा (सावनेर) मंदिराबाहेरचा वैदर्भीय प्रकारचा झुणका भाकरी ठेचा आणि टोमॅटो चटणी
इकडे वाळवंटात तग धरून राहतोय त्याला कारण आहे, मल्याळी भाषा आणि तितकाच चविष्ट साध्या. साध्याची पण वैशिष्ट्य असतात म्हणजे तुम्हाला सांबारमध्ये चिंचेचा अर्क थोडा ठसका लागण्याइतपत असेल तर कोल्लम कडचा सांबार असतो,तिखट आणि थोडं हात मोकळं सोडून तेल आणि साध्या नंतर सुलेमानी विचारत असतील तर मुस्लिम लोकांमधील कोळीकोड स्टाईल, आणि प्रचंड सात्विक असेल तर खास त्रावणकोर ब्राह्मण किंवा नायर स्टाईल आणि मास्यांचा घमघमाट सुटलेलं गोबी मन्चुरियन आणि केरला परोट्टा असेल (चुकूनही पराठा समजु नका) तर खास ओल्ड एर्नाकुलम मधील ख्रिस्ती स्टाईल हे फॉर्म्युला आता फिट्ट बसले आहेत इतके की मी घमघमाटावरून जिल्हा ओळखायला लागलोय.
बेंगळुरूतील EC मधील साई विश्राम हॉटेल मधला king size ब्रेकफास्ट
मागच्या आठवड्यात फ्लॅटमेटला इकडे वाळवंटात एका केरळी हॉटेलात घेऊन गेलो. युपीचा असुन सुद्धा मोठ्या हिमतीने त्याने साध्या ऑर्डर केला. भाताचे दोन घास खाऊन त्याने फुलके बोलविले आणि ह्या आदिमानवाला अवियल आणि सांबर सोबत पोळी खातांना बघुन मनात विचार आला की सूंदरशी भरजरी साडी नेसलेली लावण्यवती अनुष्का शेट्टी समोर असतांना काही लोकांना मक्ख कतरिना का आवडत असावी?? त्यानंतर त्याला विचारलं कसं होतं जेवण आवडलं का?? तर म्हणतो कसा "नाही होतं बरं पण खूपच नारळ येत होतं दाताखाली 😂🙏🏻

साई विश्राम मधील नॉर्थ इंडियन थाळी,
मी चाखुन बघितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दक्षिण भारतीय आणि काही उत्तर भारतीय थाळी फोटोत देतोय विथ कॅप्शन ह्यातील तुम्ही किती खाल्ल्या आहेत ते जरा आठवा. आणि हे बघुन जेवले असाल तरी भूक लागली तर येत्या २४ ऑगस्टला थिरु ओणम आहे, ज्यांना जाणं शक्य असेल त्यांनी सुंदर केरळी साडीतल्या नल्ल कुट्टी, नाजुक पुक्कलम, आणि अर्थातच चविष्ट साध्या एन्जॉय करायला ह्या सुमारास काढाच एखादी केरळची ट्रिप. अन्नपूर्णा सुखी भव 🙏🏻🙏🏻
फाईव्ह स्टार हॉटेलमधले कांदे भजे (but not worth) साई विश्राम हॉटेल, बंगळुरू

#खाद्यभ्रमंती
🖋 प्रसाद देशपांडे
0



भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे
0



आज ब-याच दिवसानंतर चुलीवर मटण बनवण्याचा योग आला....तस पाहिलं तर घरी मटण चालत नाही मि नेहमीच बाहेर मटण बनवतो पण आज मागच्या दारातून घरातील compound मध्येच चुल बनवलेली मग तिथेच तयारी केली..........साधारण 1 1/2 किलो बकरा मटण,1/4 किलो जिगरी घेतली, त्याला हळद,मिठ ,दही,मटण मसाला व अद्र क,लसूण, कोथिंबीर पेस्ट लावून छान मुरू दिले.....एका पातेल्यात बटर व तेल टाकून त्यात एका कांदयाची पेस्ट, एक टोमॅटो पेस्ट टाकून तेल सुटे पर्यंत परतून मग त्यातच बारीक वाटलेले खोबर,थोडसं लाल तिखट,कसुरी मेथी,मिठ टाकून घेतले त्यात मसाला लावून ठेवलेले मटण टाकून पाच ते दहा मिनिटे वाफवून घेतले व हळू हळू थोड पाणी टाकून वरतून झाकण ठेवून साधारण 40-45 मिनिटे शिजवून घेतले......एका पातेल्यात दाळवा पिठ,भाजून पेस्ट केलेले तीळ,बाजरीचे पिठ व काळा मसाला(तिखट) घेऊन त्यात पाणी टाकुन मिसरण तयार करून ते शिजत असलेल्या मटणात add करून पाच मिनिटे आरावर ठेवले.....वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरली............खरच चुलीवरचे मटण त्याची चव अप्रतिम च......😊
0


#खाद्ययात्रा #खादाड_खाऊ_फूड_टूर
आज मी लिहिणार आहे धुळे शहाराबद्दल.
साधारण 13 वर्षांपूर्वी मेडिकल शिक्षणाच्या📖 निमित्ताने माझा धुळ्यात आणि त्यातील acpm dental कॉलेज मध्ये प्रवेश झाला.नवीन वर्ष, नवीन कॉलेज व त्यातही नवीन शहर आणि मुख्य गावपासून साधारण 5-6 km लांब असलेलं आमचं कॉलेज.📖 त्यामुळे पहिल्या वर्षी तर असं बाहेर जाणं झालच नाही फार. पण जसे तिथे राहत गेलो तिकडची खाद्य संस्कृती समजायला लागली आणि आवडायला देखील.
सर्व प्रथम माझ्या भेटीला आले ते शेवभाजी, gatte की sabji असे पदार्थ . तो पर्यंत शेवेची भाजी होऊ शकते आणि gatte असा बेसनाचा काही पदार्थ असतो हे मला माहित नव्हते. पण हळू हळू आवडायला लागले.तसेच डाळ बाटी churma हा ही त्यातलाच एक . आता खाली मी जे पदार्थ लिहीन ते मी साधारण 9 वर्षांपूर्वी कॉलेज सोडले तेव्हा दिलेल्या address वर मिळत होते.
1) सर्वप्रथम माझी सगळ्यात आवडती पाणीपुरी.😍😘 आग्ररोड च्या अलीकडच्या लेन मध्ये, त्याला आधी नवग्रही गल्ली म्हणत तिथे लालबाग पाणीपुरी वाला आहे tyachyakadchi पाणीपुरी म्हणजे खासमखास...दरवेळी गेलं की खायची. त्याला मी माझा धुळ्यात शिरण्याचा टॅक्स म्हणायचे😂😂




2) नंतर त्याच्याच जवळ जरा पुढे जाऊन सँडविच ची गाडी ' प्रेम सँडविच' 🍔आणि त्याच्या लगेच बाजूला " मटकी भेळ"🍲
3) तिथून पुढे आग्रा रोड च्या दिशेने गेलं की एक dairy होती..त्याच्याकडची बासुंदी किंवा दूध म्हणजे पर्वणीच.🍵
4) नदी काठाला असलेल्या साबुदाणा वड्यांच्या गाड्यांवरचे साबुदाणे वडे.

5) मला exact ठिकाण आठवत नाही पण बहुतेक महात्मा गांधी रोड असावा तिथल्या दुकानातील पात्रा भजी( अळू वाडी), दही मिसळ, आणि फाफडा जिलेबी😋🍥

6) बांबू गल्ली मध्ये रगडा पॅटीस च्या गाडीवर मिळायचं ते रगडा पॅटीस अप्रतिम होत.
7) प्रभाकर आणि राजकमल आणि मनोहर adlabs theatre च्या समोर एक साधंच हॉटेल होतं. नाव exact आठवत नाही पण तिकडची भरीत भाकरी🍪, शेवभाजी , डाळ खिचडी सगळंच लै 👌भारी होतं. शनिवार दुपारचा मूवी बघायच्या आधी आमचा तिथला लंच ठरलेला.
8)धुळ्यावरून आमच्या कॉलेज ला जाताना सिंधी कॅम्प लागायचा त्याच्या स्टॉप वर एक चाट ची गाडी असायची त्याच्या कडे डाळ पक्वान्न एकदम testy मिळतं
9) आमचं कॉलेज धुळे साक्री रस्त्यावरच्या मोराणे गावातलं. कॉलेज च्या थोडं पुढे जाऊन काठियावाडी ढाबा आहे तिकडची शेवभाजी,पनीर भुर्जी, नागली पापड आणि भाकऱ्या हा आमचा आवडता मेनु. काठियावडी च्या अलीकडे एक पाववडे वाला आहे त्याच्याकडे बटाटावडा व पाववडे दोन्ही खास मिळतात.
10) कॉलेज च्या अलीकडे कृष्णाई mhanun एक 3 स्टार हॉटेल आहे . त्याच्याकडच्या पदार्थांची टेस्ट फार चांगली आहे.तेव्हा आम्हाला फार अप्रूप होत त्याचं कारण तिथे तेव्हा असा खाणं सर्रास मिळायचं नाही ना.
11) aagra road जवळ एक थाळी पण मिळायची तेव्हा 80 rs. वगरे असेल... नाव चेतना dining हॉल होतं. घरच्या खाण्याची आठवण आली की आम्ही तिथे जायचो. मऊसूत पोळ्या आमचं मन तृप्त करायच्या.
12) मुंबई धुळे highway वरचे वालचंद बापू व त्याच्या बाजूचा ढाबा दोन्ही कडे छान जेवण मिळायचं.
13) लास्ट but not least महिंद्रा ढाबा. कॉलेज स्टुडंट्स ची जान रात्री अपरात्री कधीही उघडा. त्याच्या कडचा चहा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे.
ता.क.-मी जे काही लीहिल आहे ते साधारण 9 वर्ष आधीच आहे . आज कदाचित अजून खूप दुकानं/ गाड्या झाल्या असतील जिथे अजूनही खास पदार्थ मिळत असतील पण ते आज मला माहित नाहीत.ज्यांना माहीत असतील त्यांनी comment मध्ये add केले तरी चालतील.
0



शेजवान सॉस schezwan sauce


0

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels